ॲडम झाम्पाच्या शिरपेचात मानाचा तुरा, आता नोंदवला असा विक्रम
11 November 2023
Created By: Rakesh Thakur
ॲडम झाम्पाने बांगलादेशविरुद्ध दोन विकेट घेत शाहिद आफ्रिदीचा फिरकी गोलंदाज म्हणून विक्रम मोडला.
बांगलादेशविरुद्धच्या साखळी सामन्यातही त्याने 10 षटकांत 32 धावा देत 2 बळी घेतले होते.
फिरकीपटू ॲडम झम्पा चांगली कामगिरी करत असून त्याने 9 लीग सामन्यांमध्ये 22 विकेट घेतल्या आहेत.
ॲडम झाम्पाने बांगलादेशविरुद्ध 2 बळी घेत शाहिद आफ्रिदी आणि ब्रॅड हॉगला मागे टाकले.
विश्वचषकात फिरकीपटू म्हणून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांक गाठला आहे.
शाहिद आफ्रिदीने 2011 मध्ये 21 तर हॉगने 2007 मध्ये 21 विकेट घेतल्या होत्या.
सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन अव्वल आहे. 2007 साली 23 बळी घेतले होते.
या विश्वचषकात झाम्पाने आणखी 2 विकेट घेतल्यास तो मुरलीधरनचा विक्रम मोडेल.