3 सप्टेंबर 2025
Created By: संजय पाटील
टी 20I क्रिकेटमध्ये काही रेकॉर्ड हे सहजासहजी होत नसतात. जवळपास 2 दशकांपासून टी 20I क्रिकेट सामने होत आहेत. मात्र आतापर्यंत फक्त दोघांनाच 2 हजार धावा आणि 100 विकेट्स घेता आल्या आहेत
बांगलादेशचा अनुभवी ऑलराउंडर शाकिब अल हसन याने टी 20I क्रिकेटमध्ये 2 हजार 551 धावा केल्या. तसेच 149 विकेट्सही मिळवल्यात.
शाकिब अल हसन याच्यानंतर या यादीत आता अफगाणिस्तानचा अनुभवी ऑलराउंडर मोहम्मद नबी याचं नाव जोडलं गेलं आहे.
मोहम्मद नबी याने टी 20I क्रिकेटमध्ये 2 हजार 246 धावा केल्या आहेत. तसेच 101 विकेट्स मिळवल्या आहेत.
अफगाणिस्तानच्या ऑलराउंडरने 2 सप्टेंबरला पाकिस्तान विरुद्ध ऐतिहासिक कामगिरी केली.
मोहम्मद नबी याने पाकिस्तान विरुद्ध 4 ओव्हरमध्ये 20 धावा देत 2 विकेट्स मिळवल्या.
टी 20I क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत शाकिब अल हसन आणि मोहम्मद नबी या दोघांनाच 2 हजार पेक्षा अधिक धावा आणि 100 विकेट्स घेता आल्या आहेत.