अफगाणिस्तान-न्यूझीलंड सामन्यात किळसवाणा प्रकार, टॉयलेटच्या पाण्यात धुतली भांडी!
10 सप्टेंबर 2024
Created By: राकेश ठाकुर
ग्रेटर नोएडात अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी सामना होत आहे. दोन दिवस झाले तरी हा सामना सुरु झालेला नाही.
मैदान ओलं असल्याने सामना खेळण्याच्या लायक नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सामना रद्द करण्याची वेळ आली. त्यामुळे बीसीसीआय रडारवर आली आहे.
ग्रेटर नोएडा स्टेडियममधील वाद इतक्यावरच थांबला नाही. तर स्टेडियममध्ये वापरली जाणारी भांडी टॉयलेटमध्ये धुतली गेली.
काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात कॅटरिंग स्टाफ टॉयलेटमध्ये भांडी घासत असल्याचं दिसत आहे.
ग्रेटर नोएडा स्टेडियममधील व्यवस्था पाहून अफगाणिस्तान संघ व्यवस्थापन नाराज आहे. अफगानी संघाने स्वत: हे मैदान निवडलं होतं.
तिसऱ्या दिवशीही खेळ झाला नाही तर ही कसोटी रद्द करण्याची वेळ येईल. तर आंतरराष्ट्रीय पातळीवर नाचक्की होईल ते वेगळंच..
बीसीसीआयने अफगाणिस्तानला ग्रेटर नोएडा, लखनौ आणि कानपूरमध्ये कसोटी करण्याचा पर्याय दिला होता.