ऑलिम्पिक मेडल जिंकल्यावर मिळतात 6 कोटी रुपयांचं बक्षीस
29 July 2024
Created By: राकेश ठाकुर
ऑलिम्पिक जिंकणं हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. या स्पर्धेत मेडल जिंकणाऱ्या खेळाडूला प्रत्येक देशात वेगळं बक्षीस मिळतं.
जर्मनीत ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकणाऱ्याला 18 लाख मिळतात. रजत पदकासाठी 13 लाख, कांस्य पदकासाठी 9 लाख मिळतात.
अमेरिकेत सुवर्ण जिंकल्यावर 31 लाख, रजत जिंकल्यावर 18 लाख आणि कांस्य जिंकल्यावर 12 लाख मिळतात.
फ्रान्समध्ये गोल्डसाठी 59 लाख,सिल्व्हर पदकासाठी 22 लाख, ब्राँझ जिंकल्यावर 13 लाख रुपये मिळतात.
स्पेनमध्ये गोल्डसाठी 89 लाख, सिल्व्हरसाठी 44 लाख आणि ब्राँझ मेडलसाठी 27 लाख मिळतात.
इटलीत गोल्डसाठी 1 कोटी 65 लाख, सिल्व्हरसाठी 82 लाख आणि ब्राँझसाठी 55 लाख मिळतात.
मोरोक्कोत गोल्डसाठी 1 कोटी 84 लाख, सिल्व्हरसाठी 1 कोटी 14 लाख आणि ब्राँझसाठी 68 लाख मिळतात.
तैवानमध्ये गोल्डसाठी 6 कोटी, सिल्व्हरसाठी 2 कोटी आणि ब्राँझसाठी 1 कोटी 50 लाख रुपये मिळतात.
सिंगापूरमध्ये गोल्डसाठी 6 कोटी 20 लाख, सिल्व्हरसाठी 3 कोटी, ब्राँझसाठी 1 कोटी 50 लाख रुपये मिळतात.
भारतात मेडल जिंकणाऱ्यांसाठी बक्षिसाची रक्कम ठरलेली नाही. प्रत्येक सरकारमध्ये बक्षिसी रक्कम ही वेगवेगळी असते.