अष्टपैलू कृणाल पांड्या खेळणार टी20 वर्ल्डकप?

26 April 2024

Created By: Rakesh Thakur

टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी लवकरच घोषणा होणार आहे. यापूर्वी कृणाल पांड्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. 

माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकरने टी20 वर्ल्डकपसाठी आपल्या संघाची घोषणा केली आहे. यात कृणाल पांड्याला स्थान दिलं आहे. 

मांजरेकर यांनी टीममध्ये विराट, हार्दिक, पांड्या, रिंकू, शिवम या खेळाडूंना डावललं आहे. पण कृणाल पांड्याला स्थान दिल्याने चर्चा रंगली आहे. 

कृणाल पांड्याचं नाव घेण्यामागे कारणही तसंच आहे.आयपीएलमध्ये कृणाल पांड्या चांगली गोलंदाजी करत आहे. 

कृणाल पांड्याने आयपीएलमध्ये 5 विकेट घेतले आहेत. तसेच इकोनॉमी रेट 7.42 इतका आहे.

कृणाल पांड्या लोअर ऑर्डरमध्ये चांगली फलंदाजी करतो. त्याची सरासरी 58 इतकी आहे. 

कृणाल पांड्याला तसं संघात स्थान मिळणं कठीण आहे. कारण जडेजा आणि अक्षरही चांगली कामगिरी करत आहे.