पाकिस्तानात पंचासोबत खेळाडू करतात फिक्सिंग?
20 सप्टेंबर 2024
Created By: राकेश ठाकुर
पाकिस्तानात देशांतर्गत चॅम्पियन्स वनडे कप सुरु आहे. यात एकूण 5 संघांनी भाग घेतला आहे.
चॅम्पियन्स वनडे स्पर्धेदरम्यान गोलंदाज फहीम अश्रफने धक्कादायक विधान केलं आहे. त्यामुळे पंचांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
क्रिकेटपटूंशी असलेल्या मैत्रीमुळे पंच त्यांच्या बाजूने निर्णय देतात. त्या बदल्यात खेळाडू त्यांची काळजी घेतात, असा आरोप फहीम अश्रफने केला आहे.
पंचांशी असलेल्या मैत्रीमुळे खेळाडूंना फायदा होतो, असा आरोपही फहीम अश्रफने केला आहे.
आमच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंचांची कामगिरी चांगली नाही. कव्हरेज होत नसल्याने पंचांकडे लक्ष जात नाही, असही अश्रफ म्हणाला.
जर माझी मैत्री पंचांसोबत असेल तर आम्ही सुरक्षित आहोत. पंच आमच्याकडून नंबर घेतात, असंही त्याने पुढे सांगितलं.
टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली फिटनेससाठी ओळखला जातो.