बंगळुरु कसोटीच्या पाचव्या दिवशी अश्विन मोडणार 3 विक्रम!
19 ऑक्टोबर 2024
Created By: राकेश ठाकुर
टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 107 धावांचं आव्हान ठेवलं आहे. न्यूझीलंडकडे सामना विजयाची संधी आहे.
पाचव्या दिवशी खेळपट्टी फिरकी साथ देणारी असेल, असा अंदाज आहे. त्यामुळे अश्विनचा रोल महत्त्वाचा असेल.
भारताने 20 वर्षापूर्वी ऑस्ट्रेलियासमोर 106 धावा डिफेंड केल्या होत्या. तेव्हा हरभजनने 5 विकेट घेतल्या होत्या.
आर अश्विन पाचव्या दिवशी शेन वॉर्नचा विक्रम मोडू शकतो. 5 विकेट घेत शेन वॉर्नला मागे टाकू शकतो. दोघांच्या नावावर 37 वेळा विक्रम आहे.
वर्ल्ड टेस्टमध्ये सर्वाधिक विकेट घेण्यासाठी फक्त 2 विकेट हव्या आहेत. सध्या 37 सामन्यात 185 विकेट घेतल्या आहेत.
आर अश्विनने पाच विकेट घेतल्या तर कसोटी सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत सातवं स्थान गाठेल. नाथनला मागे टाकण्यासाठी फक्त 3 विकेट हव्या आहेत.
पाचव्या दिवशी पावसाचं दाट सावट आहे. त्यामुळे सामना होईल की नाही याबाबत शंका आहे. अन्यथा आणखी एक सामना वाट पाहावी लागेल.