19 सप्टेंबर 2025
Created By: संजय पाटील
टीम इंडियाने आशिया कप 2025 स्पर्धेतील साखळी फेरीत दोन्ही सामने जिंकलेत. भारताचा या फेरीतील तिसरा आणि अंतिम सामना 19 सप्टेंबरला होणार आहे.
टीम इंडिया साखळी फेरीतील आपल्या तिसर्या सामन्यात ओमान विरुद्ध भिडणार आहे. उभयसंघातील हा सामना अबुधाबीतील शेख झायेद स्टेडियममध्ये होणार आहे.
टीम इंडिया आणि ओमान या निमित्ताने पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत. याआधी दोन्ही संघात कोणत्याही फॉर्मेटमध्ये एकही सामना झालेला नाही.
टीम इंडियाचा हा 250 वा टी 20i सामना ठरणार आहे. भारत यासह टी 20i क्रिकेटच्या इतिहासात 250 सामने खेळणारा दुसरा संघ ठरणार आहे.
टीम इंडियाला सुपर 4 आधी साखळी फेरीत ओमान विरुद्ध सामना जिंकून विजयी हॅटट्रिक करण्याची संधी आहे.
तसेच ओमानचा आशिया कप 2025 साखळी फेरीतील शेवटचा सामना असणार आहे. ओमनाला पहिल्या दोन्ही सामन्यात पराभूत व्हावं लागलं.
भारत विरुद्ध ओमान सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.