भावा कडक! संजू सॅमसनची अविस्मरणीय कामगिरी, ठरला पहिलाच भारतीय विकेटकीपर

20  सप्टेंबर 2025

संजू सॅमसन याने ओमान विरुद्ध दमदार खेळी केली. संजूने आशिया कप 2025 स्पर्धेत पहिल्यांदाच मिळालेल्या बॅटिंगच्या संधीचा फायदा घेत अर्धशतक ठोकलं. 

संजूने ओमान विरुद्ध 45 बॉलमध्ये 56 रन्स केल्या. संजूने या खेळीत 3 चौकार आणि 3 षटकार लगावले. 

संजूने 41 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. संजूच्या कारकीर्दीतील हे सर्वात संथ अर्धशतक ठरलं. 

संजू ओमानविरुद्ध टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. संजूच्या या खेळीमुळे भारताला 21 धावांनी विजय मिळवता आला.

संजूने या अर्धशतकासह मोठा विक्रम केला. संजू टी 20 आशिया कप स्पर्धेत 50 पेक्षा अधिक धावा करणारा भारताचा पहिला विकेटकीपर फलंदाज ठरला आहे. 

संजूने ओमान विरुद्ध केलेल्या कामगिरीसाठी त्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं. संजूने यासह आणखी एक विक्रम केला.

संजूची POTM ठरण्याची टी 20I क्रिकेटमधील तिसरी वेळ ठरली. संजू यासह 3 वेळा मॅन ऑफ पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय विकेटकीपर ठरला. 

अखेर ती माझ्या आयुष्यात आली..; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बनेची पोस्ट चर्चेत