शुबमन आणि अभिषेक दोघांपैकी टी 20i मध्ये सरस कोण?

13 ऑगस्ट 2025

Created By:  संजय पाटील

भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिल आशिया कप स्पर्धेत खेळताना दिसू शकतो. रिपोर्ट्सनुसार, शुबमनला उपकर्णधारपदाची जबाबदारी मिळू शकते.

शुबमन उपकर्णधार झाल्यास त्याचा लहानपणीचा मित्र अभिषेक शर्मा याच्या अडचणीत वाढ होऊ शकते.

शुबमन ओपनर आहे. शुबमनची निवड झाल्यास तो अभिषेकची जागा घेऊ शकतो.

गिलने इंग्लंड दौऱ्यात कडक बॅटिंग करत अनेक रेकॉर्ड्स केले. मात्र टी 20I मध्ये अभिषेक आणि शुबमनपैकी सरस कोण? जाणून घेऊयात.

गिलने 21 टी 20I मध्ये 30.42 च्या सरासरीने 578 धावा केल्या आहेत.

अभिषेक शर्मा याने 16 टी 20I सामन्यांमध्ये 33.43 च्या सरासरीने 535 धावा केल्या आहेत.

शुबमनने आतापर्यंत टी 20I मध्ये 22 तर अभिषेकने 41 षटकार लगावले आहेत.

शुबमनने टी 20I मध्ये 3 अर्धशतकं आणि 1 शतक लगावले आहे. तर अभिषेकने 2 शतकं आणि 2 अर्धशतकं झळकावली आहेत.

न्यूझीलंडने कसोटी इतिहासातील तिसरा सर्वात मोठा विजय नोंदवला