आशिया कप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात हाँगकाँगच्या गोलंदाजाने रचला इतिहास

9 सप्टेंबर 2025

Created By:  राकेश ठाकुर

अफगाणिस्तानविरुद्ध हाँगकाँगचा गोलंदाज अतिक इक्बालने विक्रमी कामगिरी केली.

पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानचा संघ वर्चस्व गाजवेल अशी शक्यता होती. पण तसं काही झालं नाही. 

हाँगकाँगचा गोलंदाज अतिक इक्बालने केलेली कामगिरी येणाऱ्या अनेक वर्षांपर्यंत लक्षात राहील अशी आहे.

टी20 क्रिकेटमध्ये  क्वचितच असं घडतं. पण टी20 आशिया कपमध्ये असं करणारा चौथा गोलंदाज ठरला आहे. 

अतिकने चौथं षटक टाकत एक गडी बाद केला. तसेच एकही धाव दिली नाही. या स्पर्धेच्या पॉवरप्लेमध्ये असे करणारा तो चौथा गोलंदाज ठरला आहे.

आतापर्यंत भारताकडून फक्त एक आणि पाकिस्तानकडून दोन गोलंदाजांना हे करण्यात यश आले आहे. भारताकडून भुवनेश्वर कुमारने अशी कामगिरी केली.

भारत आणि पाकिस्तानच्या तीन गोलंदाजांव्यतिरिक्त अतिक इक्बाल हा असा एकमेव गोलंदाज बनला आहे

आशिया कप 2025 पूर्वी संजू सॅमसनने केली मोठी घोषणा