29 ऑगस्ट 2025
Created By: संजय पाटील
दुलीप ट्रॉफी 2025 स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात नॉर्थ झोनचा वेगवान गोलंदाज आकिब नबी याने हॅटट्रिक घेत ऐतिहासिक कामगिरी केलीय.
आकिबने ईस्ट झोन विरुद्ध पहिल्या डावातील 53 व्या ओव्हरमधील शेवटच्या 3 चेंडूंमध्ये विराट सिंह, मनीषी आणि मुख्तार हुसैन यांना आऊट करत हॅटट्रिक पूर्ण केली.
आकिब यासह दुलीप ट्रॉफी स्पर्धेत हॅटट्रिक घेणारा तिसरा गोलंदाज ठरला. दिग्गज कपिल देव यांनी सर्वात आधी 1978 साली नॉर्थ झोन विरुद्ध ही कामगिरी केली होती.
वेस्ट झोनसाठी खेळणाऱ्या साईराज बहुतुले यांनी 2000 साली ईस्ट झोन विरुद्ध हॅटट्रिक घेतली होती.
आकिबने हॅटट्रिनंतर त्याच्या स्पेलमधील पुढील ओव्हरमधील पहिल्या बॉलवर आणखी 1 विकेट घेतली. आकिब यासह 4 बॉलमध्ये 4 विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज ठरला.
आकिबने मोहम्मद शमी याला आऊट करत एका डावात 5 विकेट्स पूर्ण केल्या.
आकिबने आतापर्यंत देशांतर्गत क्रिकेटमध्ये जम्मू-काश्मीरसाठी खेळताना 29 फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये 22 विकेट्स घेतल्या आहेत.