11 ऑगस्ट 2025
Created By: संजय पाटील
ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20I मालिकेत विजयी सलामी दिली. कांगारुंनी हा सामना जिंकला.
ऑस्ट्रेलियाने डार्विनमध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यात 17 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.
टीम डेव्हिड हा ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा हिरो ठरला. टीमने 52 बॉलमध्ये 8 सिक्सच्या मदतीने 83 धावांची स्फोटक खेळी केली.
डेव्हिड व्यतिरिक्त जोश हेझलवूड आणि बेन ड्वारशुईस या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या.
ऑस्ट्रेलियाचा हा टी 20I वर्ल्ड कपआधीचा सलग नववा विजय ठरला. यामुळे इतर सर्व संघांसाठी ही धोक्याची घंटा आहे.
ऑस्ट्रेलियाने याआधी विंडीजला 5-0 ने पराभूत केलं होतं. तर त्याआधी पाकिस्तानचा 3-0 ने धुव्वा उडवला होता.
ऑस्ट्रेलियाची ही कामगिरी भारताचं डोकेदुखी वाढवणारी आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात दोन्ही संघात 5 सामन्यांची मालिका होणार आहे.