ऑस्ट्रेलिया 450/2, भारत 65 वर ऑलआउट, भविष्यवाणी!

17 November 2023

Created By: Rakesh Thakur

वर्ल्डकपमध्ये अंतिम फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ भिडणार आहेत.

दोन्ही संघ यापूर्वी 2003 मध्ये अंतिम फेरीत आमनेसामने आले होते.

टीम इंडियाने 1983 आणि 2011 चा वर्ल्डकप जिंकला आहे. तर ऑस्ट्रेलिया पाचवेळा जेतेपद जिंकली आहे.

मिचेल मार्शनं भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीचं भाकीत वर्तवलं आहे. 

मिचेल मार्शने सांगितलं की, ऑस्ट्रेलिया 450/2 धावा करेल. तर भारत 65 धावांवर ऑलआऊट होईल.

मार्शने आयपीएल 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्स पॉडकास्टवर वर्ल्डकपची भविष्यवाणी केली होती.

ऑस्ट्रेलिया सर्व सामने जिंकत अंतिम फेरी गाठेल असंही मार्शने सांगितलं होतं.

ऑस्ट्रेलियाला भारत आणि दक्षिण अफ्रिकेने साखळी पराभूत केलं आहे.