ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूवर दु:खाचा डोंगर कोसळलाय

04 November 2023

Created By: Chetan Patil

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात आज 4 नोव्हेंबरला सामना झाला. या सामन्याच्यावेळी सर्व खेळाडू हातात काळी पट्टी घालून मैदानात आले.

ऑस्ट्रेलियाच्या संघाने या माध्यमातून ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श याच्या दु:खावर संवेदना व्यक्त केल्या आहेत

मिचेल मार्श यावर्षी वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाच्या टीममधून खेळत आहे. पण इंग्लंड विरुद्धच्या सामन्याच्या दोन दिवस आधीच तो मायदेशी परत गेलाय.

मार्श कौटुंबिक कारणास्तव आपल्या घरी ऑस्ट्रेलियाला गेलाय. त्याचं परत जाण्याचं कारण समोर आलंय.

मिचेल मार्श याच्या आजोबांचं गुरुवारी निधन झालं. या दुखद परिस्थितीत आपल्या कुटुंबासोबत राहण्यासाठी तो ऑस्ट्रेलियाला गेलाय.

या संकट काळातही तो आपली जबाबदारी विसरलेला नाही. तो पुन्हा वर्ल्ड कपसाठी उद्या भारतात येणार आहे.

या संकट काळातही तो आपली जबाबदारी विसरलेला नाही. तो पुन्हा वर्ल्ड कपसाठी उद्या भारतात येणार आहे.

माधुरी दीक्षितचा मराठमोळा लुक, पाहा फोटो

माधुरी दीक्षितचा मराठमोळा लुक, पाहा फोटो