4 मार्च 2025

ऑस्ट्रेलियाच्या या क्रिकेटपटूचा सारासोबत झाला साखरपुडा

ऑस्ट्रेलिया संघ चॅम्पियन्स ट्रॉफीत टीम इंडियाविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना खेळत आहे. या संघातील एका खेळाडूचं सारासोबत खास नातं आहे.  

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज स्पेन्सर जॉनसनचं मागच्या वर्षी सारासोबत साखरपुडा झाला आहे.

स्पेन्सर जॉनसनचा साखरपुडा ऑगस्ट 2024 मध्ये सारा पेथरिकसोबत झाला होता. लवकरच दोघं लग्नबंधनात अडकणार आहेत. 

स्पेन्सर आणि सारा गेल्या काही वर्षांपासून एकत्र आहेत. अनेक कार्यक्रमात या दोघांनी हजेरी लावली आहे.

स्पेन्सर क्रिकेटपटू असून त्याची होणारी पत्नी सारा एडिलेडमध्ये आर्किटेक्चरल फर्ममध्ये काम करते. 

साराने कायम स्पेन्सर जॉनसनला पाठिंबा दिला आहे. करिअरसाठी तिने त्याला कायम सपोर्ट केला आहे.

स्पेन्सर जॉनसन आणि सारा पेथरिकने आपल्या साखरपुड्याची माहिती सोशल मीडियावरून दिली होती.