बाबर आजम कर्णधार पदाचा राजीनामा देणार?

10 November 2023

Created By: Chetan Patil

पाकिस्तान क्रिकेट संघ वर्ल्ड कप 2023 च्या स्पर्धेतील शेवटचा सामना उद्या खेळणार आहे.

पाकिस्तानच्या टीमचा यावर्षीचा वर्ल्ड कपमधील प्रवास उद्या संपण्याची शक्यता आहे. 

पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात उद्या सामना होणार आहे.

पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये यायचं असेल तर उद्या त्यांना अद्भुत विजय मिळवून दाखवावं लागेल.

पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये येण्यासाठी न्यूजीलंडच्या नेट रनरेट पेक्षा जास्त रनरेटने हरवावं लागेल.

पण ते खूप अवघड आहे. पाकिस्तानला हा सामना 287 धावांनी जिंकावा लागेल.

या वर्ल्ड कपनंतर पाकिस्तानची टीम वर्षभर कोणताही वनडे सामना खेळणार नाही, असा निर्णय पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने घेतलाय.

तसेच बाबर आजमचं कर्णधारपद धोक्यात आलं आहे. कदाचित ते कर्णधार पदाचा राजीनामा देऊ शकतात, अशी जोरदार चर्चा आहे.

बाबर आजमच्या कर्णधार पदावर अनेकांनी नाराजी व्यक्त केलीय. पाकिस्तानच्या अनेक माजी क्रिकेटपटूंनी बाबर आजमच्या राजीनाम्याची मागणी केलीय  

बॉलिवुड अभिनेत्री मौनी रॉयने शेअर केला नवीन लुक

दिवाळीत या टिप्स फॉलो करा आणि प्रदूषणापासून स्वतःला वाचवा