शोएब मलिकमुळे बाबर आझम कर्णधारापासून वंचित! पाकिस्तानमध्ये नवा वाद
298ऑगस्ट 2024
Created By: राकेश ठाकुर
पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स वनडे कप स्पर्दा होणार आहे. या स्पर्धेत पाच संघ भाग घेणार आहेत. या स्पर्धेपूर्वी खळबळजनक बातमी समोर आली आहे.
या स्पर्धेत बाबर आझमला स्टॅलियन्स संघाचा कर्णधार व्हायचं होतं. पण त्याने याला स्पष्ट नकार दिला.
पाकिस्तान मिडिया रिपोर्टनुसार, बाबर आझमने शोएब मलिकमुळे कर्णधार होण्यास नकार दिला.
शोएब मलिकला स्टॅलियंस संघाचा मेंटॉर बनवलं आहे. बाबर आणि शोएब या दोघांमध्ये वाद असल्याची चर्चा आहे.
शोएब मलिकने नुकतीच बाबर आझमविरुद्ध वक्तव्य केलं होतं. तसेच कर्णधारपदावरून दूर करण्यास सांगितलं होतं.
बाबर आझम बांगलादेशविरुद्ध कसोटीत फेल ठरला आणि संघाचा पराभवही झाला.
जय शाह यांची आयसीसी चेअरमनपदी नियुक्ती झाली असून त्यांना सर्वच स्तरातून शुभेच्छा मिळत आहेत.