बांगलादेशच्या प्रशिक्षकावर टांगती तलवार, बीसीबी अध्यक्षांनी काढला जुना राग
22 ऑगस्ट 2024
Created By: राकेश ठाकुर
बांगलादेशमध्ये सत्तांतरानंतर बऱ्याच घडामोडी घडत आहेत. बांगलादेश क्रिकेट बोर्डातही बदल झाले आहेत. नव्या अधिकाऱ्यांची एन्ट्री झाली आहे.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदी फारूख अहमद विराजमान झाले आहेत. त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली आहे.
अध्यक्षपदाची धुरा हाती घेताच प्रशिक्षक चंडिका हाथुरुसिंघा यांच्यावर कारवाईचा बडगा उचलला आहे. तसेच कोच पदासाठी शोध सुरु केला आहे.
चंडिका हाथुरुसिंघा यांचा प्रशिक्षकपदाचा कालावधी फेब्रुवारी 2025 पर्यंत आहे. असं असूनही नव्या कोचची वर्णी एक दोन लागेल असं फारुख यांनी सांगितलं आहे.
एका यूट्यूब चॅनेलवर फारुख अहमद यांनी सांगितलं की, चंडिका विश्वासाच्या लायक नाही. त्याने जे काय केलं, ते पाहता कोचपदी राहण्याचा हक्क नाही.
फारुख अहमद यांचा हा निर्णय जुन्या रागातून घेतल्याचं बोललं जात आहे. चंडिका यांच्यामुळे फारुख अहमद यांना फटका बसला होता.
मिडिया रिपोर्टनुसार, चंडिका हाथुरुसिंघा यांच्यामुळेच फारुख अहमद यांना 2016 मध्ये निवड समिती अध्यक्षपद सोडावं लागलं होतं.