बीसीसीआय रोहित आणि विराटचा पगार कमी करणार! कारण काय?

7 मार्च 2025

BCCI लवकरच वार्षिक कराराची घोषणा करणार, त्यानुसार काही खेळाडूंचं प्रमोशन तर काहींचं डिमोशन होणार

नव्या वार्षिक करारात विराटचं वेतन कमी होण्याची शक्यता, BCCI विराटला A+ श्रेणी तून A श्रेणीत टाकण्याची शक्यता

तसेच रोहित शर्मा याचंही डिमोशन निश्चित, विराटसह रोहितचा पगारही कमी होणार!

रोहित-विराट टी 20I क्रिकेटमधून निवृत्त, नियमांनुसार तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळणाऱ्यांनाच Bcci कडून A+ प्लसनुसार वेतन

विराट आणि रोहितचं A+ श्रेणीनुसार वार्षिक वेतन 7 कोटी, तर दोघांना नव्या करारानुसार 5 कोटी (A) मिळण्याची शक्यता

तसेच श्रेयस अय्यर याचा वार्षिक करारात समावेश केला जाऊ शकतो, गेल्या वेळेस त्याला वगळण्यात आलं होतं

श्रेयसला बीसीसीआयकडून ब श्रेणीअंतर्गत वार्षिक करार मिळू शकतो, तसं झाल्यास खेळाडूला वार्षिक 3 कोटी मिळणार