टीम इंडियाचा भुवनेश्वर कुमारने निवृत्तीबद्दलचे मौन सोडले, म्हणाला..

3 सप्टेंबर 2025

Created By:  राकेश ठाकुर

टीम इंडियाचा स्विंग किंग म्हणून ओळखला जाणारा भुवनेश्वर कुमार बऱ्याच काळापासून क्रिकेटपासून दूर आहे.

भारतासाठी 121 वनडे आणि 87 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा भुवनेश्वरने दैनिक जागरणला आपल्या निवृत्तीबद्दल सांगितले.

भुवनेश्वर कुमारने 2022 मध्ये टीम इंडियासाठी शेवटचा वनडे सामना खेळला आणि टी20 आंतरराष्ट्रीय सामनाही याच वर्षी खेळला.

तीन वर्षांपासून टीम इंडियातून बाहेर असलेला भुवनेश्वर कुमारने पुनरागमनाबद्दल स्पष्ट काय ते सांगितलं.

'निवड समिती माझ्या पुनरागमनाला उत्तर देईल आणि माझे काम मैदानावर येऊन माझे 100 टक्के देणे आहे.'

'मला मुश्ताक अली, रणजी किंवा एकदिवसीय संघात खेळण्याची संधी मिळाली, तर मी माझे सर्वोत्तम प्रदर्शन देऊन पुढे जाऊ इच्छितो.' 

'एक शिस्तबद्ध गोलंदाज म्हणून माझे लक्ष योग्य लाईन आणि लेंथवर असते. तुम्ही कितीही चांगले प्रदर्शन केले तरी कधीकधी नशीब तुम्हाला साथ देत नाही.'

कोहलीसमोर बीसीसीआय नमलं? लंडनमध्येच दिली फिटनेस टेस्ट