18 ऑगस्ट 2025
Created By: राकेश ठाकुर
रवींद्र जडेजा हा अष्टपैलू खेळाडू असून त्याचं तलवारबाजी सेलिब्रेशनही प्रसिद्ध आहे.
रवींद्र जडेजाच्या तलवारबाजी सेलिब्रेशनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं आहे. असं करणं त्याच्यासाठी धोक्याचं आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ब्रेट लीने सांगितलं की, जडेजासाठी असं सेलीब्रेशन धोक्याची घंटा आहे.
ब्रेट लीच्या मते, जडेजाने तलवारबाजी सेलीब्रेशनपासून दूर राहिले पाहीजे. कारण यामुळे तो जखमी होऊ शकतो.
ब्रेट लीच्या मते, जडेजाच्या या सेलिब्रेशनमुळे शोल्डरच्या रोटेटरला इजा होऊ शकते. असं करताना काळजी घ्यायला हवी.
जडेजाने इंग्लंड दौऱ्यात तलवारबाजी सेलीब्रेशन मोठ्या थाटात केलं. अर्धशतक आणि शतकानंतर त्याने असं केलं.
रवींद्र जडेजाने इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यात 5 अर्धशतक आणि एक शतक ठोकलं. त्यात त्याने 516 धावा केल्या.