पाकिस्तानला पराभूत करत बांगलादेशने मोडला 137 वर्षे जुना विक्रम
3 सप्टेंबर 2024
Created By: राकेश ठाकुर
बांगलादेशने पाकिस्तानला त्यांच्याच भूमीत 6 गडी राखून पराभूत केलं. दोन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 ने जिंकली.
बांगलादेशने पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय मिळवला आहे. 137 वर्षानंतर कोणत्या संघाने कसोटीत असा विजय मिळवला आहे.
बांगलादेशचा संघ पहिल्या डावात 26 वर 6 विकेट गमवून बसली होती. असं असूनही कसोटी जिंकली. 137 वर्षानंतर असं घडलं आहे.
बांगलादेशने पाकिस्तानला पहिल्यांदा कसोटीत पराभूत केलं आहे. बांगलादेशचा पाकिस्तानातही पहिलाच विजय आहे.
बांगलादेशने 2009 मध्ये पहिल्यांदा विदेशी भूमीवर मालिका जिंकली होती. यात वेस्ट इंडिजला पराभूत केलं होतं.
शान मसूदच्या नावावर एक नकोसा विक्रम रचला गेला आहे. मसूद हा पाकिस्तानचा पहिला कर्णधार आहे. ज्याच्या नेतृत्वात सुरुवातीचे पाच कसोटी सामने गमावले.
पाकिस्तानचा संघ घरच्या मैदानावर 10 कसोटी सामने जिंकला नाही. यात 6 मध्ये पराभव, तर 4 ड्रॉ झाले आहेत.