रोहित शर्माच्या त्या सवयीने टीम इंडिया टेन्शनमध्ये?

30 April 2024

Created By: राकेश ठाकुर

रोहित शर्माला टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी टीम इंडियाचं नेतृत्व सोपवलं आहे. पण त्याच्या एका सवयीने खेळाडूंना त्रास होतो.

रोहित शर्माच्या त्या सवयीने जवळपास सर्वच दौऱ्यात टीम इंडियाला अडचणीचा सामना करावा लागला आहे. 

रोहित शर्माच्या वाईट सवयीचा एका मुलाखतीत विराट कोहलीने खुलासा केला होता.

विराट कोहलीने सांगितलं होतं की, "रोहितला विसरण्याची सवय आहे. त्यामुळे तो अनेक गोष्टी विसरतो."

विराटने दिलेल्या माहितीनुसार, रोहित शर्मा हॉटेलमध्ये कधी पर्स, कधी मोबाईल, कधी आयपॅड विसरतो. काही वेळेस पासपोर्टही विसरला आहे.

विराटने सांगितलं की, मी आतापर्यंत इतका विसरणारा माणूस पाहिला नाही. बसमध्ये बसल्यावर त्याला काय विसरला ते आठवतं.

त्याच्या या सवयीमुळे हॉटेलमधून निघताना त्याला हॉटेल मॅनेजरकडून विचारलं जातं. सर्वकाही सोबत घेतलं की नाही ते. त्यानंतरच बस सुटते.