पाकिस्तान क्रिकेट सुधारण्यासाठी चाहत फतेह अली घेणार पुढाकार!
18 June 2024
Created By: राकेश ठाकुर
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानचं आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आलं आहे.
पाकिस्तानला नवख्या अमेरिका संघाकडून पराभव स्वीकारावा लागला. भारतानेही धोबीपछाड दिला.
पाकिस्तानच्या निराशाजनक कामगिरीनंतर चाहत्यांना संताप झाला आहे. टीमपासून व्यवस्थापन बदलण्याची मागणी होत आहे.
आता पाकिस्तान क्रिकेट सुधारण्यासाठी चाहत फतेह अली खान पुढाकार घेणार आहे. सध्या त्यांची गाणी वेगळ्याच कारणाने गाजत आहेत.
'बदो बदी' गाणं व्हायरल झालेल्या चाहत यांनी सांगितलं की, ते पीसीबी अध्यक्ष बणण्यास तयार आहे आणि पाकिस्तानी क्रिकेटला ट्रॅकवर आणू इच्छित आहे.
लंडनमध्ये राहणाऱ्या चाहतने सांगितलं की, पाकिस्तानी क्रिकेटपटूंना आठवड्यातून चारवेळा कोचिंग देणार आहे. खेळाडूंना शिस्तीचं पालन करावं लागेल.
चाहत फतेहचं खरं नाव काशिफ राणा आहे. ते एक क्रिकेटपटू होते. त्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेट खेळलं आहे. तसेच लंडनमध्ये काही वर्षे क्लब क्रिकेट खेळलं.