क्रिकेटर ऋतुराजकडून निवृत्तीची घोषणा
10 सप्टेंबर 2024
Created By: संजय पाटील
राजस्थानचा वेगवान गोलंदाज ऋतुराज सिंह याची निवृत्तीची घोषणा
ऋतुराज सिंहचा वयाच्या अवघ्या 33 व्या वर्षी डोमेस्टिक क्रिकेटला अलविदा
ऋतुराज निवृत्ती जाहीर करताना भावूक, "क्रिकेटने खूप दिलं, 14 वर्षांचा प्रवास थांबवतोय", असं ऋतुराजने म्हटलं
ऋतुराजकडून राजस्थानचं 54 फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व, तर 21 लिस्ट ए आणि 25 टी20 सामन्यांचा अनुभव
ऋतुराजने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 176 विकेट्स घेतल्या. तसेच लिस्ट ए मध्ये 16 तर टी 20 मध्ये 19 विकेट्स मिळवल्या
ऋतुराजने टी 20 सामन्यात 6.83 च्या इकॉनॉमीने धावा दिल्या, त्यानंतरही त्याची आयपीएलमध्ये निवड नाही
ऋतुराज दुलीप ट्रॉफी स्पर्धेत सेंट्रल झोनकडून खेळलाय, तसेच तो इंडिया ए साठीही खेळला