इंग्लंड पाकिस्तान कसोटीच्या पहिल्याच दिवशी गदारोळ, झालं असं की..
7 ऑक्टोबर 2024
Created By: राकेश ठाकुर
इंग्लंड पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका होत आहे. या मालिकेतील पहिला सामना मुल्तानमध्ये होत आहे.
पाकिस्तानात पुन्हा एकदा पाटा विकेट बनवली गेली आहे. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर टीका होत आहे.
मुल्तानची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल आहे. गोलंदाजांचा येथे कस लागणार आहे. म्हणूनच पाकिस्तानने नाणेफेक जिंकत फलंदाजी निवडली.
पाटा विकेट पाहून इंग्लंडच्या काही माजी खेळाडूंनी पाकिस्तान बोर्डावर टीका केली आहे.
इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनने लिहिलं की, 'मुल्तानची विकेट गोलंदाजांसाठी दफनभूमी'
मायकल वॉनने लिहिलं की, 'या खेळपट्टी रोड घोषित केलं जावं.' पाकिस्तान यापूर्वीही अशा खेळपट्ट्यांसाठी टीकेचा धनी ठरला आहे.
पाकिस्तानच्या खेळाडूंनी पाटा विकेटचा पुरेपूर फायदा उचलला. अब्दु्ल्ला शफीक आणि शान मसूदने शतकी खेळी केली.