आयपीएल 2024 साठी 3 संघांना मिळणार नवे कर्णधार!

7 December 2023

Created By: Rakesh Thakur

आयपीएल 17 चा मिनी लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबई येथे होणार आहे. 

लिलावासाठी एकूण 1166 खेळाडूंनी आपली नावे नोंदवली आहेत. 

या खेळाडूंची यादी शॉर्टलिस्ट केली जाईल आणि त्यानंतर खेळाडूंची लिलाव यादी जाहीर होईल.

आयपीएल सीझन 17 लिलावापूर्वी तीन कर्णधार बदलणे जवळपास निश्चित आहे.

हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्सने ट्रेड केले. गुजरात टायटन्सने शुभमन गिलला कर्णधारपदाची धुरा दिली आहे.

डेव्हिड वॉर्नरने आयपीएल 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व केले होते. पण कर्णधार ऋषभ पंत पुनरागमन करत आहे.

श्रेयस अय्यर दुखापतीमुळे गेल्या मोसमात केकेआरकडून खेळला नव्हता. त्यामुळे संघाचे नेतृत्व नितीश राणा यांच्याकडे होते.