हरल्यानंतरही टीम इंडियाच्या नावावर विक्रम, ऑस्ट्रेलियाला धोबीपछाड

29 November 2023

Created By: Rakesh Thakur

पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत ऑस्ट्रेलियाने तिसरा सामना जिंकत 2-1 ने कमबॅक केलं.

तिसरा सामना गमवल्यानंतरही टीम इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड तोडण्यात यशस्वी ठरली. 

तिसऱ्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 222 धावा केल्या होत्या.

मालिकेत तिसऱ्यांदा भारताने 200 च्या पार धावा केल्या आहेत. 

एकाच देशाविरुद्ध टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 200 धावा करण्याचा विक्रम भारताने रचला. 

टीम इंडियाने सहाव्यांदा ऑस्ट्रेलियाविरुद्ध 200 पार धावा केल्या आहे. 

ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरुद्ध 5 वेळा 200 हून अधिक धावा करण्याचा विक्रम केला होता.

दक्षिण अफ्रिकेने भारत आणि इंग्लंड विरुद्ध पाच वेळा 200 हून अधिक धावा केल्या आहेत.