550 शतकं करूनही टीम इंडिया या दोन देशांच्या मागे, वाचा आकडेवारी
19 ऑक्टोबर 2024
Created By: राकेश ठाकुर
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना सुरु आहे.
सामन्याच्या दुसऱ्या डावात सरफराज खानने शतक ठोकलं. त्याचं हे पहिलं आंतरराष्ट्रीय शतक आहे. हे शतक टीम इंडियासाठी खास राहिलं.
टीम इंडियाने कसोटी क्रिकेट इतिहासात 550 शतकं पूर्ण केली आहेत. अशी कामगिरी करणारा तिसरा संघ ठरला.
टीम इंडियाकडून पहिलं कसोटी शतक 1933 मध्ये आलं होतं. लाला अमरनाथने ठोकलं होतं. आता सरफराजच्या शतकाने हा आकडा 550 वर पोहोचलाय.
कसोटीत सर्वाधिक शतक ठोकण्यात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे संघ आघाडीवर आहेत.
ऑस्ट्रेलिया या यादीत दुसऱ्या स्थानावर असून 892 शतकं ठोकली आहेत.
इंग्लंडचा संघ या यादीत पहिल्या स्थानावर असून 927 शतकं ठोकली आहेत.