रहाणे आणि पुजाराच्या जागी कोण खेळणार?
3 सप्टेंबर 2024
Created By: संजय पाटील
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडिया नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार, पुजारा-रहाणेला संधी मिळण्याची शक्यता कमी
दिनेश कार्तिकनुसार, रहाणे-पुजाराच्या जागी शुबमन गिल आणि सरफराज खान दावेदार
कार्तिकनुसार, दोन्ही युवा खेळाडूंची इंग्लंड विरुद्ध मायदेशातील कसोटी मालिकेत उल्लेखनीय कामगिरी, त्यामुळे त्यांना संधी मिळण्याची शक्यता
कार्तिकनुसार, सरफराजमध्ये रहाणे-पुजारा यांची जागा घेण्याची क्षमता
पुजारा-रहाणे जोडीची गेल्या 2 BGT स्पर्धेत भारताला विजयी करण्यात निर्णायक भूमिका
पुजाराच्या 2018-2019 दौऱ्यात सर्वाधिक 521 धावा
तसेच रहाणेने 2020-21 दौऱ्यात शतकासह टीम इंडियाला विजय मिळवून दिला, त्याच्या नेतृत्वात मालिकाही जिंकली