आयपीएलमध्ये सर्वाधिक डॉट बॉल खेळणारे फलंदाजी माहिती आहे का?

12 April 2024

Created By: Rakesh Thakur

जोस बटलर हा आयपीएलमधील सर्वात धोकादायक फलंदाज आहे. या आयपीएल स्पर्धेत त्याने शतकही ठोकलं आहे. पण असं असलं तरी नको त्या पंगतीत बसला.

आयपीएल 2022 स्पर्धेत बटलरने राजस्थानसाठी 863 धावा केल्या. जवळपास 600 चेंडू खेळला. यात 230 डॉट बॉल होते.

मायकल हसी 2013 मध्ये 566 चेंडू खेळला आणि 700 पेक्षा जास्त धावा केल्या. मात्र यात 203 डॉट बॉल होते. 

आयपीएल 2015 मध्ये सिमन्सने 441 चेंडूत 540 धावा केल्या. पण 201 चेंडू निर्धाव घालवले. 

आयपीएल 2013 मध्ये द्रविडने 110 च्या स्ट्राईक रेटने 471 धावा केल्या. पण 200 डॉट बॉल खेळला. 

आयपीएल 2009-10 मध्ये कॅलिसने 494 चेंडूत 572 धावा केल्या. यात 196 निर्धाव चेंडू होते. 

सौरव गांगुली 2009-10 मध्ये खेळला. यात 419 चेंडूत 493 धावा केल्या. यात 195 निर्धाव चेंडू होते.