डोडा गणेशला 30 दिवसातच कोच पदावरून काढलं
14 सप्टेंबर 2024
Created By: राकेश ठाकुर
भारताचा माजी गोलंदाज डोडा गणेशला अवघ्या 30 दिवसांनंतर केनियाच्या हेड कोच पदावरून दूर केलं.
डोडा गणेश याची गेल्या महिन्यात केनिया पुरुष क्रिकेट संघाच्या हेड कोचपदी नियुक्ती करण्यात आली होती.
केनियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून डोडा यांची नियुक्ती अंतरिम कोच लॅमेक ओन्यांगो यांच्यानंतर झाली होती.
डोडासोबतच ओनयांगो, जोसेफ अंगारा आणि जोसेफ असिची यांचाही कोचिंग स्टाफमध्ये समावेश होता.
डोडा केनिया क्रिकेट संघाला एक नवीन दिशा देईल, असं वाटत असताना कार्यकाळ संपुष्टात आला.
प्रस्थापित प्रक्रियेचे पालन न केल्यामुळे कार्यकारी मंडळाने नियुक्तीला मान्यता देण्यास नकार दिला आहे.
डोडाने देशांतर्गत स्तरावर कर्नाटकचे प्रतिनिधित्व केले आणि भारतासाठी चार कसोटी आणि एक वनडे खेळले.