विराट कोहलीने केली तोडफोड, खुर्चीवर काढला राग!
15 ऑक्टोबर 2024
Created By: राकेश ठाकुर
भारत आणि न्यूझीलंड यांच्या 16 ऑक्टोबरपासून कसोटी मालिका सुरु होत आहे. यासाठी विराट कोहलीने चांगलाच घाम गाळला.
बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेत विराट कोहली काही खास करू शकला नाही. विराट कोहली पुढच्या सामन्यासाठी तयारी करत आहे.
विराट कोहलीने नेट सेशनमध्ये आकाश दीपला आक्रमक शॉट्स मारले. एका शॉटमुळे मैदानातील खूर्ची तुटली.
बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतही असंच काहीसं केलं होतं. चेन्नई प्रॅक्टिस करताना ड्रेसिंग रुमची भिंत फोडली होती.
विराट कोहलीने सरावादरम्यान एका युवा खेळाडूला आपली बॅट गिफ्ट दिली. तसेच बॅटवर ऑटोग्राफही केली.
विराट कोहली यापूर्वी अनेक खेळाडूंना बॅट गिफ्ट दिली आहे. नुकतीच त्याने आकाश दीपला बॅट दिली होती.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटीतील पहिला सामना 16 ऑक्टोबरपासून खेळला जाणार आहे. बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये हा सामना आहे.