8 सप्टेंबर 2025
Created By: संजय पाटील
इंग्लंड क्रिकेट टीमला गेल्या काही वर्षांपासून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सातत्याने संघर्ष करावा लागत आहे. इंग्लंडला सातत्याने विजयी होता येत नाहीय. इंग्लंडने गेल्या 6 पैकी 5 मालिका गमावल्या आहेत.
दक्षिण आफ्रिकेने यजमान इंग्लंडवर सलग 2 सामन्यांमध्ये मात करत मालिका जिंकली. मात्र इंग्लंडने तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात मात करत वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.
इंग्लंडने तिसऱ्या सामन्यात पहिल्या दोन्ही पराभवाची परतफेड करत इतिहास घडवला. इंग्लंडने वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांच्या अंतराने मोठा विजय मिळवला
इंग्लंडने साऊथम्पटनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 414 धावा केल्या. इंग्लंडची दक्षिण आफ्रिकेविरुद्धची ही सर्वोच्च धावसंख्या ठरली.
इंग्लंडची वनडे क्रिकेटमध्ये 400 पेक्षा अधिक धावा करण्याची ही सातवी वेळ ठरली. इंग्लंडने यासह भारताच्या विक्रमाची बरोबरी केली. तर दक्षिण आफ्रिकेने असा कारनामा 8 वेळा केला आहे.
इंग्लंडच्या 415 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचं अवघ्या 72 रन्सवर पॅकअप झालं. इंग्लंडने यासह मोठा कीर्तीमान केला.
इंग्लंडने यासह सर्वात जास्त धावांच्या फरकाने एकदिवसीय सामना जिंकला. इंग्लंडने यासह टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला. टीम इंडियाने 2023 आशिया कप फायनलमध्ये श्रीलंकेवर 317 धावांनी विजय मिळवला होता.