टी20 वर्ल्डकप 2024 साठी टीम इंडियात पाच स्टार्स, कोणाला मिळणार संधी

7 December 2023

Created By: Rakesh Thakur

टी20 वर्ल्डकप 2024 अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणार आहे. यासाठी आतापासून तयारी सुरु झाली आहे.

टीम इंडिया दक्षिण अफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका, त्यानंतर अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार आहे. 

टी20 वर्ल्डकपासाठी आता संघ निवडीची डोकदुखी वाढली आहे. कोणाला घ्यायचं हा प्रश्न आहे. 

यशस्वी जयस्वाल उत्तम फलंदाजी करत आहे. भारतासाठी 12 टी20 सामन्यात त्याने 349 धावा केल्या आहेत. 

ऋतुराज गायकवाडही चांगली सुरुवात करून देत आहे. त्याच्यात नेतृत्वात टीम इंडियाने आशियाई क्रिडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं होतं.

इशान किशनही चांगल्या फॉर्मात आहे. इशान किशनने वारंवार मोठी खेळी केली आहे. यष्टीरक्षणाची भूमिकाही बजावू शकतो. 

शुबमन गिलनेही 11 टी20 सामन्यात 304 धावा केल्या आहेत. यात एका शतकाचा समावेश आहे.

रोहित शर्माने शेवटचा टी20 वर्ल्डकप खेळावा अशी अनेकांची इच्छा आहे. रोहितला संधी मिळाली तर सलामीच्या अडचणी वाढतील.