30 ऑगस्ट 2025
Created By: संजय पाटील
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर वनडे क्रिकेटला अलविदा करणार आहे. त्यामुळे कॅप्टन म्हणून रोहितची जागा कोण घेणार?
रोहितची वनडे कॅप्टन म्हणून जागा घेण्यासाठी शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांची नावं चर्चेत आहेत.अशात माजी क्रिकेटर सुरेश रैना याने विधान केलं आहे.
मात्र सुरेश रैनाने वनडे कॅप्टन म्हणून तिसऱ्याच खेळाडूचं नाव घेतलंय. रैनानुसार हार्दिक पंड्या वनडे कॅप्टन्सीसाठी दावेदार आहे.
रैनानुसार, हार्दिकमध्ये धोनीचे गुण आहेत. तसेच रैनाने हार्दिकची तुलना माजी कर्णधार कपिल देव यांच्याशी केली.
"हार्दिक व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये कॅप्टन म्हणून अनेक चमत्कार करु शकतो. शुबमनही कॅप्टन असू शकतो", असं रैनाने शुभंकर मिश्रा यांच्या युट्यूब चॅनेलवर म्हटलं.
"हार्दिककडे कपिल देव यांच्याप्रमाणे बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंगचा अनुभव आहे. मला हार्दिकमध्ये कुठेतरी धोनीची झलक दिसते" असं रैनाने म्हटलं.
दरम्यान रोहितच्या निवृत्तीनंतर टी 20I कॅप्टन्सीसाठी हार्दिक प्रबळ दावेदार होता. मात्र निवड समितीने फिटनेसचं कारण देत हार्दिकला वगळून सूर्याला कॅप्टन केलं होतं.