माजी क्रिकेटर युवराज सिंह याच्या बहिणीची टीम इंडियात निवड

15 ऑगस्ट 2025

Created By:  संजय पाटील

टीम इंडियाचा माजी ऑलराउंडर युवराज सिंह याने भारताला 2 वेळा वर्ल्ड कप जिंकून देण्यात निर्णायक भूमिका बजावली. 

युवराजने बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंगच्या जोरावर  असंख्य विक्रम केले. त्यानंतर आता युवराजची बहीणही भारतासाठी खेळण्यासाठी सज्ज झाली आहे.

युवराजची सावत्र बहिण अमरजोत कौर उर्फ एमी बुंडेल हीची भारतीय पॅडल संघात निवड करण्यात आली आहे.

सध्या क्रीडा विश्वात पॅडलची चर्चा पाहायला मिळत आहे. एमीने पॅडलमध्ये आपला ठसा उमटवला आहे.

एमीची ऑगस्टमध्ये मलेशियातील क्वालालंपूरमध्ये होणाऱ्या आशिया पॅसिफिक पॅडल कप स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.

एमी ही तिचे वडील योगराज सिंग यांची दुसरी पत्नी नीना बुंदेल यांची मुलगी आहे.

एमी खेळाव्यतिरिक्त तिच्या खास लूकसाठी सोशल मीडियावर चर्चेत असते.

न्यूझीलंडने कसोटी इतिहासातील तिसरा सर्वात मोठा विजय नोंदवला