11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

आयपीएलमध्ये कोट्यवधी कमवूनही सायकल चोरीमुळे करिअर उद्ध्वस्त

13 मार्च 2024

Created By: Rakesh Thakur

आयपीएल ही जगातील श्रीमंत लीगपैकी एक आहे. यात खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांची उधळण होते. 

आयपीएल खेळणारे काही खेळाडू आज कुठेच दिसत नाहीत. असंच काहीसं ल्यूक पॉमर्सबॅकबाबत घडलं आहे. 

ल्यूक पॉमर्सबॅक हा ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू आहे. पंजाब आणि आरसीबीसाठी आयपीएल खेळला आहे.

ल्यूक पॉमर्सबॅकने आयपीएलमधील 17 सामन्यात 302 धावा केल्या आहेत. तसेच कोट्यवधी रुपयांची कमाई केलीय.

एका महिलेला मारहाण केल्याप्रकरणी त्याला 2013 साली आयपीएलमधून निलंबित करण्यात आलं. 

2020 मध्ये पॉमर्सबॅकवर चोरीचा आरोप होता. सायकल आणि दारू चोरीचा ठपका होता. या प्रकरणी अटक वॉरंटही जारी करण्यात आलं होतं.

ल्यूक पॉमर्सबॅककडे राहायला घर नव्हतं आणि तो त्याच्या कारमध्येच झोपायचा.