बुमराहबाबत वसीम अक्रमने व्यक्त केलं असं मत, म्हणाला..

वसीम अक्रमने इंग्लंडविरुद्ध 3 बळी घेणाऱ्या जसप्रीत बुमराहचे कौतुक केले आहे.

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात बुमराहने 7 षटके टाकली आणि 32 धावा दिल्या आणि 3 महत्त्वाचे बळी घेतले.

इंग्लंडच्या डावाच्या पाचव्या षटकात बुमराहने विकेट घेत कलाटणी दिली.

पाचव्या षटकातील 5व्या चेंडूवर मलानला आणि 6व्या चेंडूवर रूटला तंबूत पाठवलं. 

बुमराहचे नवीन चेंडूवर माझ्यापेक्षा चांगले नियंत्रण आहे, असं कौतुक अक्रमने केलं आहे. 

उजव्या हाताच्या फलंदाजांना नवीन चेंडू टाकताना मला चेंडूवर नियंत्रण ठेवता येत नव्हते.