23 ऑगस्ट 2025
Created By: संजय पाटील
क्रिकेट विश्वात अनेक टी 20 स्पर्धा खेळवण्यात येतात. आयपीएलनंतर अपवाद वगळता प्रत्येक देशात टी 20 स्पर्धा खेळवण्यात येते. आता SA 20 लीगमध्ये काही भारतीय खेळाडू खेळताना दिसू शकतात.
SA 20 स्पर्धेच्या चौथ्या हंगामासाठी एकूण 13 भारतीय खेळाडूंनी ऑक्शनसाठी नावं नोंदवली आहेत. या 13 खेळाडूंमध्ये वर्ल्ड कप विजेता संघातील पीयूष चावला याचाही समावेश आहे.
पीयूष चावला याने SA 20 लीग साठी त्याचं नाव नोंदवलं आहे. पीयूषला चौथ्या हंगामात कोणता संघ घेणार? हे काही दिवसांतच स्पष्ट होईल.
पीयूष व्यतिरिक्त अंकित राजपूत आणि सिद्धार्थ कौल या दोघांनीही ऑक्शनमध्ये आपलं नाव दिलं आहे. हे दोघेही आयपीएलमध्ये खेळले आहेत.
तिघांव्यतिरिक्त महेश अहीर, सरुल कंवर, अनुरीत कथुरिया, निखिल जगा, मोहम्मद फैद, केएस नवीन, अन्सारी मारुफ, इमरान खान, वेंकटेश गलिपेल्सी आणि अतुल यादव यांनीही आपलं नाव नोंदवलंय.
नियमानुसार , भारतीय खेळाडू विदेशी लीग स्पर्धेत सहभागी होऊ शकत नाहीत. मात्र निवृत्तीनंतर ती अट शिथील होते.
दिनेश कार्तिक, प्रवीण तांबे आणि उन्मुक्त चंद हे तिघे साऊथ आफ्रिका टी 20 स्पर्धेत खेळले आहेत.