रोहित शर्माच्या त्या वक्तव्यामुळे गौतम गंभीर संतापला, म्हणाला..

28 November 2023

Created By: Rakesh Thakur

रोहित शर्माने सांगितलं की, मला आणि इतर खेळाडूंना द्रविडसाठी विश्वचषक जिंकायचा होता.

रोहित शर्माचे हे वक्तव्य माजी सलामीवीर गौतम गंभीरला आवडले नाही.

'खेळाडूने देशासाठी प्रथम विश्वचषक जिंकला पाहिजे', असं मत गंभीरने स्पष्टपणे मांडलं आहे.

'प्रत्येक खेळाडूला आणि प्रशिक्षकाला विश्वचषक जिंकायचा असतो. असं का घडते हे मला अजूनही समजले नाही.'

'2011 मध्येही हा प्रकार घडला होता. एका व्यक्तीने विश्वचषक जिंकावा असे तुम्ही म्हणता तेव्हा ते चुकीचे आहे.'

'हा प्रश्न मला 2011 मध्ये देखील विचारण्यात आला होता, तेव्हा मी म्हणालो की नाही, मला माझ्या देशासाठी हे करायचे आहे.'

गौतम गंभीरनेही त्याचा सहकारी मोहम्मद कैफच्या वक्तव्याचंही खंडन केलं आहे.

अंतिम सामन्यानंतर आपले मत मांडताना कैफ म्हणाला होता की, या स्पर्धेतील सर्वोत्तम संघाने विश्वचषक जिंकला नाही.