गौतम गंभीरला कोणी पाया पडायला सांगितलं होतं?
21 मे 2024
Created By : राकेश ठाकुर
टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी गौतम गंभीरच्या नावाची चर्चा आहे.
गौतम गंभीरने या दरम्यान एका मोठ्या घटनेचा खुलासा केला आहे. पाया न पडल्याने संघात निवड झाली नव्हती असं सांगितलं आहे.
गौतम गंभीरची एकूण संपत्ती 200 कोटींहून अधिक आहे. वडिलांचा कोट्यवधी रुपयांचा कपड्यांचा व्यवसाय आहे.
गौतम गंभीरने केलेला खुलासा धक्कादायक आहे. गौतम गंभीरने 12 वर्षांचा असताना घडलेला प्रकार सांगितला आहे.
गौतम गंभीरने सांगितलं की, पहिल्या अंडर 14 संघात निवड झाली नाही. कारण तेव्हा निवडकर्त्यांचे पाया पडलो नाही.
गौतम गंभीरने सांगितलं की, तेव्हाच ठरवलं होतं की कधीच कोणाच्या पाया पडणार नाही आणि कोणाला पडू देणार नाही.
गौतम गंभीर क्रिकेटविश्वातील मोठं नाव आहे. भारताला दोन वर्ल्डकप जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.