भारताच्या या खेळाडूचा कॅच सुटला आणि गिलख्रिस्टचं करिअर संपलं, स्वत:च केला खुलासा
27 सप्टेंबर 2024
Created By: राकेश ठाकुर
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू एडम गिलख्रिस्टने क्लब प्रेयरी फायर पॉडकास्टमध्ये निवृत्तीबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.
गिलख्रिस्टने सांगितलं की, 2008 मध्ये भारताविरूद्धच्या कसोटीत एक सोपा झेल सोडला आणि त्यानंतर निवृत्तीचा निर्णय घेतला.
गिलख्रिस्टने सांगितलं की, भारताविरूद्धच्या कसोटी सामन्यात व्हीव्हीएस लक्ष्मणचा कॅच सुटला होता.
व्हीव्हीएस लक्ष्मणचा झेल सोडल्यानंतर गिलख्रिस्टने त्याचा रिप्ले मैदानातील स्क्रिनवर 32 वेळा पाहिला होता.
32 वेळा रिप्ले पाहिल्यानंतर रिटायरमेंटची जाणीव झाली. मग पहिल्यांदा मॅथ्यू हेडनला सांगितलं की कसोटी खेळणार नाही.
भारताविरूद्धच्या कसोटी मालिकेनंतर वेस्ट इंडिज दौरा होता. भारतात 100 कसोटी सामना खेळायचा होता. पण मध्येच निवृत्ती जाहीर केली.
100 व्या कसोटीसाठी पत्नीसोबत पूर्ण प्लानिंग केली होती. असं असूनही गिलख्रिस्टने निवृत्ती घेतल्याचं सांगितलं.