20 ऑगस्ट 2025
Created By: राकेश ठाकुर
आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. या संघात यशस्वी जयस्वालला स्थान मिळालं नाही.
यशस्वी जयस्वालच्या जागी शुबमन गिलला संघात संधी मिळाली आहे. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
जयस्वाल आणि गिल यांच्यात कोण बेस्ट? चला जाणून घेऊयात आकडेवारीच्या माध्यमातून
शुबमन गिलने टी20 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 578 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट हा 139.27 चा आहे.
जयस्वालने टी20 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 723 धावा केल्या आहेत. त्याने 164.31 स्ट्राईक रेटने धावा केल्या.
जयस्वालने टी20 मध्ये 5 अर्धशतकं आणि शतक ठोकलं आहे. तर शुबमन गिलने 3 अर्धशतकं आणि एक शतक ठोकलं आहे.
आकडेवारीवरून, जयस्वाल गिलपेक्षा उजवा आहे. पण गिलकडे भविष्यातील कर्णधार म्हणून पाहीलं जात आहे.