नर्व्हस 90 चा बळी ठरल्यानंतर गर्लफ्रेंडने वाढवलं ऋषभ पंतचं मनोबल
19 ऑक्टोबर 2024
Created By: राकेश ठाकुर
न्यूझीलंडविरुद्ध विकेटकीपर ऋषभ पंतने चांगली खेळी केली. टीम इंडियाला कठीण प्रसंगातून बाहेर काढलं.
ऋषभ पंतने दुसऱ्या डावात 105 चेंडूत 99 धावांची खेळी केली. यात 9 चौकार आणि 5 षटकार मारले.
ऋषभ पंतचं शतक अवघ्या एका धावेने हुकलं. यानंतर पंतची गर्लफ्रेंड ईशा नेगीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
ईशाने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर पंतचा एक फोटो शेअर केला आहे. त्यात तिने, गोल्डन बॉय आणि नजर लागू नये यासाठीचा एक इमोजी टाकला आहे.
ईशा नेगीने यापूर्वीही ऋषभ पंतच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
भारतीय कसोटी क्रिकेटमध्ये 12 वर्षानंतर विकेटकीपरसोबत असं घडलं. यापूर्वी धोनी 2012 मध्ये 99 वर आऊट झाला होता.
टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 107 धावांचं आव्हान दिलं आहे.