'जोपर्यंत माझे पाय काम..' मॅक्सवेलचं आयपीएलबाबत मोठं विधान

6 December 2023

Created By: Rakesh Thakur

ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने आपल्या टीकाकारांना वारंवार प्रत्युत्तर दिले आहे.

एकदिवसीय विश्वचषकानंतर मॅक्सवेल टी20 विश्वचषकाची तयारी करत आहे.

भारताविरुद्धच्या टी20 मालिकेतील सुरुवातीचे सामने खेळल्यानंतर एक आठवड्याचा ब्रेक घेतला.

आता पुन्हा एकदा बिग बॅश लीगमध्ये संघाचे नेतृत्व करताना दिसेल.

असं असताना आयपीएल किती महत्त्वाची आहे? हे त्याने ठामपणे सांगितलं.

जोपर्यंत माझे पाय काम करतात आणि मी क्रिकेट खेळण्याच्या स्थितीत आहे तोपर्यंत मी आयपीएल स्पर्धा खेळत राहीन.

अधिकाधिक ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी आयपीएलमध्ये भाग घ्यावा, कारण त्यातून भरपूर अनुभव मिळेल, असं मॅक्सवेल म्हणाला.