आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी गुजरात टायटन्स फ्रेंचायझीचा मालक बदलला!
13 सप्टेंबर 2024
Created By: राकेश ठाकुर
आयपीएल मेगा लिलावापूर्वीच गुजरात टायटन्स फ्रेंचायझी विकली गेली आहे. पुढच्या पर्वात नवा मालक असेल.
गुजरातच्या टॉरेंट ग्रुपने हा संघ विकत घेतला आहे. पण यासाठी किती किंमत मोजली हे गुलदस्त्यात आहे.
रिपोर्टनुसार, गौतम अदानी गुजरात संघ घेण्यासाठी शर्यतीत होते. पण शेवटी टॉरेंट ग्रुपने बाजी मारली.
टॉरेंट फार्मा कंपनी असून वॅल्यू 2 लाख कोटी रुपयांहून अधिक आहे.
2021 मध्ये गुजरात टायटन्स संघ सीवीसी ग्रुपने 5625 कोटी विकत घेतला होता. आता त्याची किंमत 8 हजार कोटींहून अधिक आहे.
गुजरात टायटन्सने पहिल्याच पर्वात जेतेपद मिळवलं होतं. तसेच दुसऱ्या पर्वात अंतिम फेरी गाठली होती.
गुजरात टायटन्सचा मालक बदलल्याने आता व्यवस्थापनही बदलेल यात शंका नाही.