क्रिकेट किट घेण्यासाठी नव्हते पैसे, तरीही 8 लाखांची गाडी चालवायचा हार्दिक?
11 ऑक्टोबर 2024
Created By: राकेश ठाकुर
अष्टपैलू हार्दिक पांड्या 11 ऑक्टोबरला 31 वर्षांचा झाला आहे.
हार्दिक पांड्या आज क्रिकेटमधील मोठं नाव असून कोट्यवधींचा मालकही आहे.
पण काही वर्षांपूर्वी हार्दिकच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती नाजूक होती. काही पैशांसाठी दोन्ही भाऊ लांब लांब खेळायला जायचे.
हार्दिकने मुलाखतीत सांगितलं की, आयपीएलमध्ये येण्यापूर्वी कृणाल आणि मी गावात खेळायला जायचो. तिथे मला 400 आणि कृणालला 500 रुपये एका सामन्याचे मिळायचे.
त्यावेळेस या दोन्ही भावांकडे 8 लाखांची कार होती.ही गाडी घेऊन ते फिरायचे. पण त्यांच्याकडे किटसाठी पैसे नव्हते.
हार्दिकने सांगितलं की, जेव्हा आर्थिक स्थिती सुधारत होती तेव्हा दोघांनी मिळून कार घेतली होती. पण वडिलांना एका रात्रीत दोन हृदयविकाराचा झटका आला.
तेव्हापासून वडील काम करत नव्हते आणि आर्थिक स्थिती ढासळली. तरीही दोन्ही भावांनी कार विकण्याऐवजी ठेवली. तसेच अधिक मेहनत घेतली.