23 फेब्रुवारी 2025

हार्दिक पांड्याला पाकिस्तानविरुद्ध खेळणं आवडतं, कारण...

अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पुन्हा एकदा आपली कर्तृत्व सिद्ध केलं. 

हार्दिकने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दोन विकेट्स घेतल्या. 

टीम इंडियाला त्यांची सर्वात जास्त गरज होती तेव्हा त्याने हे विकेट्स घेतले. बाबर आझमची महत्त्वाची विकेट पंड्याने घेतली.

अर्धशतक झळकावल्यानंतर भारतासाठी धोका निर्माण करणाऱ्या सउद शकीलची विकेटही घेतली. हार्दिक पांड्या कायम पाकिस्तानसाठी त्रासदायक ठरला आहे.

हार्दिक पांड्याने आयसीसी स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध 14 विकेट घेतल्या.

हार्दिक पांड्याने 216 आंतरराष्ट्रीय सामन्यात जवळपास 30 च्या सरासरीने 200 विकेट घेतल्या आहेत.

वनडेच्या 85 डावात 89 विकेट घेतल्या. तसेच 11 कसोटीत 17 विकेट, तर टी20 102 डावात 94 विकेट घेतल्या.